नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आता सध्या बरेच शेतकरी पीएम किसान सन्मान निधीची खूप आतुरतेने वाट पाहत आहेत ,पण शेतकरी बंधूंनो तुम्हाला ह्या पीएम किसान सन्मान निधी म्हणजे दोन हजार रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला शेतकरी आयडी काढणे खूप महत्त्वाचे आहे. शेतकरी आयडी म्हणजे यामध्ये एक शेतकरी क्रमांक असतो आणि आणि तो क्रमांक असल्याशिवाय तुम्हाला किसान सन्माननीतीचे पैसे भेटणार नाही तर शेतकरी आयडी काढणे आता सीएससी केंद्रावर सुरू झालेले आहे, तर ज्या शेतकरी बांधवांनी अजून पर्यंत शेतकरी आयडी काढला नाही त्या सर्व शेतकरी बांधवांनी ते काढणं खूप गरजेचे आहे. शेतकरी आयडी क्रमांक शिवाय किसान सन्माननिधी तुमच्या खात्यात येणार नाही.
शेतकरी ओळखपत्र कुठे कुठे कामी येणार आहे
1) PM किसान सन्माननिधी साठी शेतकरी ओळखपत्र अनिवार्य आहे
2) Digital पीक कर्ज (kcc)3) पीक विमा
4) DBT साठी अनिवार्य
तरी या शेतकरी ओळखपत्रात आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे आधार कार्ड ऑनलाइन होणार आहेत आणि त्यावरून आपल्याला शेतकऱ्याचा ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड सारखा क्रमांक भेटेल. हे ओळखपत्र तुम्हाला वरील सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी ज्या केंद्र सरकार व राज्य सरकार विविध योजना आणत असते त्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला शेतकरी ओळखपत्र काढणे खूप गरजेचे आहे. आता जर तुम्ही हे शेतकरी ओळखपत्र काढलं नाही तर पीएम किसान सन्मान निधीचा 19 वा हप्ता जो की चोवीस फेब्रुवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारी येथे होणाऱ्या कार्यक्रमातून थेट आपल्या बँक खात्यात पडणार आहे तो सुद्धा पडणार नाही, तर आजच शेतकरी बांधवांनो CSC सेंटर वर जा आणि आपला फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र लवकरात लवकर काढून द्या.