एकाच ठिकाणी मिळणार शेतकऱ्यांना सर्व योजना Farmer App जाणून घ्या.

एकाच ठिकाणी मिळणार शेतकऱ्यांना सर्व योजना Farmer App जाणून घ्या.

शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कृषी व अनुषंगित कामे करत असताना विविध प्रश्न समस्यांचा सामना करावा लागतो शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या ज्या काही समस्यांची निराकरण एकाच ठिकाणी करण्यासाठी त्यांना कृषी विषयक योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे, योजनांचा लाभ तत्परतेने उपलब्ध करून देणे, कृषी विषयक योजनांचा लाभ प्राप्त करून घेण्यासाठी अर्ज करणे इत्यादी. ज्या काही सर्व बाबींकरिता एकाच ठिकाणी सुविधा मिळणे आवश्यक आहे, त्यासाठी शेतकऱ्यांना उपयुक्त व सर्व समावेशक असे कृत्रिम तंत्रज्ञानावर म्हणजेच एआय आधारित म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर आधारित सिंगल विंडो इंटरफेस असलेले एक फार्मर ॲप पोर्टल तयार करण्यासाठीची समिती गठित करणे हे शासनाच्या विचारातील होतं आणि त्याच अनुषंगाने त्यांनी जी काही त्याची स्थापना असेल ती समिती ची 31 जानेवारी 2025 रोजी जे काही जीआर निर्गमित करून त्याच्यात केलेली आहे. त्याच अनुषंगाने स्थापना केल्यानंतर त्यांच्या समितीमध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांना उपयुक्त व सर्व समावेशक असे कृत्रिम तंत्रज्ञानावर आर्टिफिशियली इंटेलिजन्स आधारित असलेले फार्मर ॲप पोर्टल तयार करण्यासाठी खालील समितीची स्थापना करण्यात आलेली आहे.

Farmer app साठी खालील समितीची स्थापना करण्यात आलेली आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांचे जे काही अध्यक्ष हे असणार आहेत.कृषी आयुक्त असणार आहेत. दुसरे सदस्य तिच्यामध्ये जर पाहिले तर माननीय बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प हे सदस्य असणार आहेत. तसेच श्री गोरंटीवार सेवानिवृत्त संचालक महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे सुद्धा सदस्य असणार आहेत. आणि श्री रवींद्र माने जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी धाराशिव हे सुद्धा सदस्य असणार आहेत. तसेच समितीचे अध्यक्ष यांना जे काही आवश्यकतेनुसार सल्लागार किंवा तंत्रज्ञान यांचे साह्य घेण्यासाठी निमंत्रित करण्यात येईल हे सुद्धा अधिकार त्याच्याकडे देण्यात आलेले आहेत.

गठित करण्यात आलेल्या समितीची कामे.

  1. शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती प्राप्त करून घेणे हे समितीचे कार्य असणार आहे.
  2. शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत जे काही विविध योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या घटकांची अथवा बाबींची अथवा जे काही लाभाची माहिती आहे ते सुद्धा प्राप्त करून घेणे हे समितीचे कार्य असणार आहे.
  3. शेतकऱ्यांना समस्यांचे निवारण करण्यासाठी सत्य अस्तित्वात असलेली जी काही तक्रार निवारण आणि सल्लागार यंत्रणा असेल किंवा प्रणाली यांचा सुद्धा अभ्यास करणे या समितीचे काम आहे.
  4. शेतकऱ्यांना कृषीमध्ये येणाऱ्या अडचणींचे तात्काळ निवारण करण्यासाठी तयार करावयाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मची म्हणजेच इंटरफेस ची आखणी सुद्धा करणे काम आहे सद्यस्थितीमध्ये कृषी विभागामार्फत अस्तित्वात असणाऱ्या जे काही विविध संगणकीय प्रणालीचा अभ्यास करणे उदाहरणात जर पाहिलं तर पोखरा म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प याचे संगणकीय प्रणाली आहे तसेच महाॲग्रीटीपीटी आहे याची सुद्धा प्रणाली आहे तसेच आता नवीन आलेला प्रकल्प म्हणजे ऍक्रेष्ठ प्रकल्प यांचा अभ्यास करणे तसेच केंद्र शासनाचा जो काही विस्तार म्हणून प्रकल्प तसेच शेतकऱ्यांना एपीक पाहणी हवामान बाजारभाव इत्यादी बाबतीसाठी जे काही सद्य उपलब्ध सद्यस्थितीमध्ये उपलब्ध असलेल्या यंत्रणेचा अभ्यास करून उपलब्ध जे काही कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून सल्ला देणे हे सुद्धा त्यांचं काम असणार आहे
  5. ज्या काही वरील बाबी व आवश्यकतेनुसार आणि बाबींचा अभ्यास करून शेतकऱ्यांना उपयुक्त व सर्व समावेशक असे डिजिटल प्लॅटफॉर्म एक फार्मर ॲप आणि इंटरफेस पोर्टल तयार करण्यासाठी हे सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करणे या समितीकडे आवश्यक आहे.
  6. या समितीने पंधरा दिवसाच्या आत आपला अहवाल जो काय असेल तो शासनाला सादर करावा असे निर्देश सुद्धा देण्यात आलेला आहे असा एक जीआर आज नियुक्ती 31 जानेवारी 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना जे काही एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत आणि त्याचाच फायदा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असणार आहे सर्व जे काही उपलब्ध समस्या वगैरे असतील त्यांच्या एका सिंगल विंडोद्वारे या सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *